mukhyasamadhiश्री क्षेत्र संस्थान नारायण गडाच्या स्थापनेपूर्वी गडाखाली असलेल्या भुयारात जे ॠषी तप्चर्या करीत होते. त्यांत सिध्दनाथ नावाचे एक ॠषी होते. त्यांनी भागवत धर्म प्रचारासाठी भूतलावर अवतार घेतला. त्याच्या आईवडिलांनी त्यांचे नाव शेटीबा असे ठेवले लोक त्यांना दादासाहेब या नावाने ओळखीत असत त्याच्या आईवडिलांची घरची परिस्थिती फार श्रीमंत होती. शेटीबा हे संताचे अवतार होते त्यामुळे त्यांना अवतार कार्याची जान होती. ऐहिक सुखात त्यांचे मन कधीच रमले नाही.

शके १७४९ साली त्यांचे गुरुबंधू महंत पहिले महादेव महाराज वैकुंठवासी झाल्यानंतर ते गडाच्या गादीवर आले. नामस्मरणा व्यतिरिक्त वेळात ते नेहमी मौन असत. कोणासही बोलत नसत. गडाचा कारभार व्यवस्थित चालवा यासाठी ते स्वतः जवळ पाटी व पेन्सील ठेवीत व लिहून दाखऊन सर्व कामे करून घेत बोलणे फारच जरुरीचे असेल तर रात्री दहाचे नंतर दोन तीन मिनिटे बोलून पुन्हा मौनावस्थेत रहात.

त्यांचे विशेष वैशिष्टये असे होते कि ते जेवढा नैवेध देवाला अर्पण करीत, तेवढेच अत्र ते स्वःता च्या उदरनिर्वाहासाठी खात असत इतर वेळी ते उपवास करीत असत. गडावर येणाऱ्या प्रत्येक भाविकांस  जेवल्याशिवाय परत जाऊ देत नसत. त्याप्रमाणे येणाऱ्यांच्या हातून देखील काही सेवा घडावी, आपण गडावर फुकटचे अत्र खाल्ले अशी भावना कोणाची होऊ नये. यासाठी दर्शनास येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून ते दगड उचलण्याचे काम करून घेत असत.

असे हे महान तपस्वी संत महादेव महाराजानंतर आठ वर्ष गडाच्या गादीवर राहिले मित्ती शु. ७ शके १७५७ साली वैकुंठभुवनी जाऊन आपल्या मूळ स्वरूपाला प्राप्त झाले.