दि. २९ जून २०१५ – श्री क्षेत्र नारायणगडाच्या विकासासाठी खासदार रजनीताई पाटील १ कोटी निधी देणार. नारायणगड प्रतिष्ठान मार्फत बीड येथे सुरु होणा-या लहान मुलांच्या वसतिगृहासाठी, MPSC , UPSC  परीक्षा मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्यासाठी  वापरला जाणार आहे असे खासदार रजनीताई पाटील यांनी आज नारायनगडावर त्यांच्या निधीतून मंजूर केलेल्या २० लाख रुपये खर्चुन उभारण्यात येणा-या सभागृह भूमिपूजन प्रसंगी केले.यावेळी महंत मठाधिपती ह.भ.प. गुरुवर्य शिवाजी महाराज यांच्या हस्ते साडी चोळी व प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नारायण गड संस्थान चे विश्वस्त श्री दिलीपअण्णा गोरे,महादेव तुपे,भीमराव मस्के,जनार्धन शेळके उपस्थित होते.याबद्दल श्री दिलीपअण्णा गोरे यांनी खासदार रजनीताई पाटील यांचे संस्थानाच्या वतीने आभार मानले.