” श्री क्षेत्र नारायण गड संस्थान ” ही एक वारकरी सांप्रदायाचे प्रसार करणारे व महाराष्ट्रातील धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेले संस्थान आहे. संस्थानाची स्थापना सुमारे २२० वर्षापुर्वी श्री संत नारायण महाराज यांनी केली आहे. सुमारे २२० वर्षाचा इतिहास असलेल्या या जुण्या संस्थानाच्या कार्याची अधिकृत माहिती विश्वातील वाचकांना, अभ्यासकांना, भाविकांना व्हावी या उद्देशाने www.narayangad.com या संकेतस्थळाचे उदघाटन श्री महंत शिवाजी महाराज मठाधिपति श्री क्षेत्र नारायणगड यांच्या हस्ते तसेच दिलीप गोरे , महादेव तुपे , भीमराव मस्के , जनार्धन शेळके आदी विश्वस्त व श्री ह.भ.प. संभाजी महाराज उत्कर्ष गवते , संतोष काशिद यांच्या उपस्थितीत दि १०/११/२०१४ रोजी श्री क्षेत्र नारायण गड संस्थान येथे करण्यात आले.

sanktstal7

संकेतस्थळाची मूळ संकल्पना श्री संतोष काशिद यांची असून त्याचे काम वै.गुरुवर्य महंत महादेव बाबा व आताचे मठाधिपती श्री महंत शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण करण्यात आले आहे . या संकेत स्थळाचे तांत्रिक नियोजन BLOSSOM PUBLICATIONS INDIA LTD. या मुंबई स्थित सुभाष काशिद व संतोष काशिद यांच्या मालकीची कंपनीने सेवाभावी वृत्तीने केले व करीत आहेत. सदरील संकेत स्थळामध्ये संत नारायण महाराजानापासून ते आताचे मठाधिपती श्री महंत शिवाजी महाराज यांच्यापर्यंत सर्वांच्या सामाजिक व धार्मिक कार्याची माहिती तसेच संस्थानाचा इतिहास , बांधकाम , सुरू असलेले वैद्यकीय उपक्रम ,वारकरी शिक्षण संस्था, गोशाळा, अन्नदान यासारखे चांगले उपक्रमाची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे .

गडावरील दैनंदिन उपक्रमाची व इतर घडामोडीची माहिती भाविकांना Facebook ,Twitter , Blog या online account वर दिलेली आहे जेणेकरून जगभरातील भाविकांना याची नोंद प्रत्यक्ष गडावर न येत घेत यावी . या online account च्या link खालीलप्रमाणे

facebook https://www.facebook.com/shreeNarayangad
twitter https://twitter.com/shreenarayangad
blog http://narayanagad.blogspot.in/

संकेतस्थळाच्या बांधणीपासून ते उदघाटना पर्यत अनेकांचे सहकार्य लाभले. श्री उत्कर्ष गवते , गवते सर , लोंढे सर यांनी नारायण गड आणि परिसराची छायाचित्रे व जुने पुस्तक उपलब्ध करुन दिले. तसेच श्री ह. भ. प. संभाजी महाराज मठाधिपती मादळमोही संस्थान यांचे सहकार्य लाभले. नारायण गड संस्थान या सर्वांचे आभारी आहे.

मा. आमदार विनायकराव मेटे यांच्या प्रयत्नाने आज दि.१५/०२/२०१८ रोजी महाराष्ट्रचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते नव्या स्वरुपातील नारायणगडाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी मा.ना. चंद्रकांतदादा पाटील , मा. पालकमंत्री पंकजाताई मुंडे व मा. ना. सुभाषराव देशमुख यांची उपस्थिती होती.

श्री क्षेत्र नारायण गड संस्थानाचा प्रसार व प्रचार हेतू इतरांनाही संकेत स्थळांस भेट देण्यास आवर्जुन सांगावे ही विनंती.