[col class=”span3″] [/col]
[col class=”span9″]

(३० डिसेम्बर २०१४) बीड जिल्ह्यातच नव्हे तर अखंड महाराष्ट्रात नारायणगड आणि भगवानगड हे लोकांचे भक्तिस्थान असून गेल्या अनेक वर्षांपासून या दोन्ही गडात काहीसे अंतर होते. मात्र यावर्षी संत भगवानबाबा यांच्या सुवर्ण महोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित कीर्तन महोत्सवाचे पहिले पुष्प नारायणगडाचे मठाधिपती ह. भ. प. शिवाजी महाराजांनी भगवानगडावर जाऊन गुंफले.

[/col]