विकास कामातून गडांची सेवा

दि. 06/04/2018 : बीड : भगवानगड व नारायणगड या दोन्ही गडाशी माझं प्रेमात नातं आहे. पालकमंत्री म्हडून विकासाच्या माध्यमातून मला गडाची सेवा करता आली, ……..
अधिक वाचाश्री क्षेत्र नारायण गड येथे 25 कोटी रू. च्या विकास कामाचे भूमिपुजन सोहळा

दि. 15/02/2018 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते सपंन झाला. यावेळी आमदार विनायक मेटे , पालकमंत्री पंकजा मुंडे , महंत गुरुवर्य शिवाजी महाराज व बीड जिल्ह्यातील सर्वच आमदाराची उपस्थिती होती .
अधिक वाचा‘देवेंद्र’ आज धाकटया पंढरीत

बीड, दि. १४(प्रतिनिधी):- राज्याचे मुख्यमंत्री यांचे करकमल नारायण गडावरील भूमिपूजनला अखेर आज लागणार आहेत. आ. विनायक मेटेंच्या विकास आयुधाचे आज लोकार्पण होत आहे. गेली २०० वारसापासून विकासापासून उपेझीत असलेली धाकली पंढरी २५ कोटींच्या विकास कामाचा शालू नेसणार आहे.
अधिक वाचाआली विकासाची जाग , येणे मुख्यमंत्र्यांना भाग चढवला मेटेंनी साज, चला नारायण गडावर आज

बीड, दि. १४(प्रतिनिधी):- हिंदु धर्माचा भगवा फडकवून दोनशे वर्षापुर्वी श्री क्षेत्र नारायणगडाची स्थापना झाली. मात्र आजपर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी हा गड विकासापासून दुर्लझीत ठेवला.
अधिक वाचानारायणगडाच्या विकासासाठी २५ कोटी
मुख्यमंत्र्याची आराखडयाला मंजुरी : भौतिक विकासाचा प्रश्न मार्गी

बीड , ता. ९ : धाकटी पंढरी अशी ओळख असलेल्या व जिल्हातील सर्व जाती -धर्माचे श्रद्धास्थान असलेल्या नारायणगड संस्थानच्या २५ कोटी रुपयांच्या विकास
आराखडयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता. नऊ) अंतिम मंजुरी दिली आहे. आता गडाच्या भौतिक विकासाचा प्रश्न मार्गी लागला आहे.

अधिक वाचासौंदाना येथे भव्य नारळी सप्ताहाची जय्यत तयारी
दि. २८ : महाराष्टातील धाकटी पंढरी म्हडून
ओळखल्या जाणान्या श्री क्षेत्र नारायणगडाचा ६६ वा फिरता नारळी सप्ताह मौजे
सौदाना येथे होणार आहे. त्या अनुषंगाने सप्ताहाच्या जागेची पहाणी करून श्री क्षेत्र नारायण गडाचे मठाधिपती ह. भ. प शिवाजी महाराज यांच्या हस्ते भुमिपूजन
करण्यात आले.

अधिक वाचाश्री क्षेत्र नारायणगड सेवा भावी संस्था आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची काल सांगता झाली.
मंडळाचे हे १४ वे वर्ष होते या सप्ताहाला मिरा भाईंदरच्या महापौर सौ. डिंपल मेहता, आमदार नरेंद्र मेहता, युवा सेना सचिव पूर्वेश सरनाईक, अनेक नगरसेवक स. पोलीस आयुक्त गुन्हे अन्वेषण ठाणे श्री मुकुंद हातोटे साहेब, छत्रपती राजर्षी शाहू बँकेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनराव जाहेर पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी व अधिकारी वर्गांनी भेट दिली. भेट देणार्याअ सर्व मान्यवरांना मंडळातर्फे सुंदर अशी ज्ञांनेश्वर माऊलीची प्रतिमा भेट देण्यात आली. यावर्षी प्रथमच दररोज कीर्तन व प्रवचंनाबरोबर मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन मंडळाने केले होते यामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून मोफत डोळे तपासणी, दात, डायबेटीस रक्त तपासणी आदी मोफत केल्या आहेत. शेवटच्या दिवशी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते यामध्ये सुमारे ७५ जणांनी रक्तदान केले व ज्या गरजू भाविकांचे मोतीबिंदू ऑपरेशन मंडळाकडून मोफत केले जाणार आहे. आरोग्य शिबिरचा लाभ असंख्य भाविकांनी घेतला.. शेवटच्या दिवशी गुरुवर्य महंत शिवाजी महाराज (मठाधिपती श्री क्षेत्र नारायणगड संस्थान बीड) यांची रथामध्ये भव्य अशी दिंडी काढण्यात आली होती यामध्ये पुरुषाबरोबरच महिलांचा सहभाग लक्षयनीय होता. दिंडी मार्गात अनेक ठिकाणी सुंदर अशी रांगोळी काढण्यात आली होती. काल्याचे कीर्तन झाल्यावर सुदधा मंडळाने प्रशिद्ध व्याख्याते श्री विनोद अनंत मेश्री यांचा “ मला शिवाजी व्हायचय “ या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

अधिक वाचाश्री क्षेत्र नारायणगडाच्या सर्वांगीण विकासासाठी आज मंत्रालयात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात पालकमंत्री, विश्वस्त, महंत व आ. मेटेंच्या उपस्तिथीमध्ये महत्वपूर्ण बैठक होत नारायणगडासाठी तीर्थक्षेत्र योजनेअंतर्गत २५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळाली आहे .
श्री . क्षेत्र नारायणगड च्या 400 एकर वरील प्रस्तावित आराखड्यात कायमस्वरूपी पाणी पुरवठा व्यवस्था, सुलभ शौचालय, सुसज्ज असे वाहनतळ व बस स्थानक, भक्त निवास, सौरऊर्जा यंत्रणा, सांस्कृतिक सभागृह, प्रसादालय, गोशाळा आदी बाबींचा जाणीवपूर्वक समावेश केला आहे.

अधिक वाचानारायणगडावरील दसरा मेळाव्याला भाविकांची प्रचंड संख्येने उपस्थिती .
महंत शिवाजी महाराज हे भव्य-दिव्य अशा ऊभारलेल्या मंचावरील सिंहासनावर आरूढ होताच भाविकांनी टाळ्यांचा जल्लोष केला महंत शिवाजी महाराज यांच्या प्रेरणादायी भाषणाने सर्व भाविकांध्ये चैतन्य निर्माण झाले
मुख्य समारंभानंतर गडाचे महंत शिवाजी महाराज यांची अश्वावर बसून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. या सोहळ्याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे अठरापगड जातीतील हजारो भाविक एकञ आले होते.पुढच्या वर्षीचा नारायणगड दसरा मेळावा लाखोंच्या संख्येने होईल असे महंत शिवाजी महाराज यांनी जाहीर करताच भाविकांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला

अधिक वाचाथोरसंत नगदनारायण महाराज यांच्या द्विशताब्दी सोहळ्यानिमित्त नारायणगडावर लाखो भाविक उपस्थित होते.
दि.21 मार्च 2016:- श्री क्षेत्र नारायणगड संस्थान बीड येथे रविवारी थोरसंत नगदनारायण महाराज यांच्या द्विशताब्दी सोहळ्यानिमित्त नारायणगडावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. विनायकराव मेटेसाहेब, उदघाटक मा. ना. रणजित पाटील साहेब, गडाचे महंत ह. भ. प. शिवाजी महाराज व व्यासपीठावर अनेक मान्यवर व लाखो भाविक उपस्थित होते.

अधिक वाचाश्री संत नगद नारायण महाराज यांच्या २०० व्या पुण्यतिथी निमित्त श्री क्षेत्र नारायण गडावर मुख्यमंत्री येणार
दि. १८ मार्च २०१६:- श्री क्षेत्र नारायणगड संस्थान बीड येथे रविवारी २० मार्च ला श्री संत नगद नारायण महाराज यांच्या द्विशताब्दी पुण्यतिथी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस,पालकमंत्री पंकजाताई मुंडे, आमदार विनायक मेटे, शिक्षण मंत्री विनोद तावडे बरोबरच जिल्ह्यातील सर्व पक्षीय आमदार व नेते उपस्थित राहणार आहेत.

अधिक वाचाश्री क्षेत्र नारायणगड संस्थान बीड येथे कार्तिकी यात्रेला सुरुवात
दि. २५ नोव्हेंबर २०१५:- श्री क्षेत्र नारायणगड संस्थान बीड येथे कार्तिकी यात्रेला दरवर्षी प्रमाणे सुरुवात झाली आहे. या वर्षी भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे .

अधिक वाचाकार्तिकी एकादशी निमित्त अवघी दुमदुमली धाकटी पंढरी
दि. २३ नोव्हेंबर २०१५:- महाराष्ट्राची धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगड संस्थान बीड येथे कार्तिकी एकादशी निमित्त भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली . सकाळी ४ वाजल्यापासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले होते .

अधिक वाचादुष्काळाचा सामना करण्यासाठी शेतकर्यांना बळ देण्याचे ह.भ.प. शिवाजी महाराजांचे साकडे
दि. २२ नोव्हेंबर २०१५:- महाराष्ट्राची धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगड संस्थान बीड येथे कार्तिकी एकादशी निमित्त ह.भ.प. शिवाजी महाराज यांनी दुष्काळाचा सामना करण्यासाठी शेतकर्यांना बळ देण्याचे साकडे नगद नारायणाला घातले . पहाटे ४ वाजता महारांजानी पूजा व आरती आरती केल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले होते .
अधिक वाचागुरुवर्य महंत शिवाजी बाबांची भव्य रथातून मिरवणूक काढण्यात आली.
दि. २० नोव्हेंबर २०१५:- श्री क्षेत्र नगद नारायण गड सेवाभावी संस्था व काशिमिरा ग्रामस्थ (मुंबई) आयोजीत, वै. श्री संत नगद नारायण महाराज यांच्या कृपेने व वै. गुरुवर्य महंत महादेव बाबा यांच्या आशीर्वादाने तसेच गुरुवर्य महंत शिवाजी महाराज मठाधिपती श्री क्षेत्र नारायणगड संस्थानं बीड यांच्या मार्गदर्शनखाली सुरू झालेल्या अखंड हरीनाम तपपूर्ती सोहळयाचे काल्याचे कीर्तन गुरुवर्य महंत शिवाजी महाराज मठाधिपती श्री क्षेत्र नारायणगड संस्थानं बीड यांचे झाले . तत्पूर्वी सकाळी बाबांची भव्य रथातून मिरवणूक काढण्यात आली.
अधिक वाचाश्री क्षेत्र नारायणगडाच्या विकासासाठी खासदार रजनीताई पाटील १ कोटी निधी देणार.

बीड दि. २९ जून २०१५ – श्री क्षेत्र नारायणगडाच्या विकासासाठी खासदार रजनीताई पाटील १ कोटी निधी देणार. नारायणगड प्रतिष्ठान मार्फत बीड येथे सुरु होणा-या लहान मुलांच्या वसतिगृहासाठी, MPSC,UPSC परीक्षा मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्यासाठी वापरला जाणार आहे असे खासदार रजनीताई पाटील यांनी आज नारायणगडावर त्यांच्या निधीतून मंजूर केलेल्या २० लाख रुपये खर्चुन उभारण्यात येणा-या सभागृह भूमिपूजन प्रसंगी केले.यावेळी महंत मठाधिपती ह.भ.प. गुरुवर्य शिवाजी महाराज यांच्या हस्ते साडी चोळी व प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी नारायण गड संस्थान चे विश्वस्त श्री दिलीप अण्णा गोरे,महादेव तुपे,भीमराव मस्के,जनार्धन शेळके उपस्थित होते.याबद्दल श्री दिलीप अण्णा गोरे यांनी खासदार रजनीताई पाटील यांचे संस्थानाच्या वतीने आभार मानले.

अधिक वाचाऔरंगाबाद – पैठण – नारायणगड बस सुरु झाली.

(दि . २३ जून २०१५) औरंगाबाद नारायणगड गाड़ी सुरु झाल्यामुळे अनेक वर्षाचे वारकरी व नारायण गड परिसरातील लोकांचे स्वप्न काल पूर्ण झाले.या गाडीचे अनेक गावात फटाके वाजवून स्वागत करण्यात आले. ही गाडी सुरु करण्यासाठी साक्षाळ पिंपरी येथील श्री शहादेव सदाफुले,नवनाथ काशीद,श्रीमंत क्षीरसागर,मधुकर घोगरे,आदि मंडळींनी पाठपुरावा केला. तसेच या कामी त्यांना शिवसंग्रामचे संस्थापक मा.आमदार श्री विनायक मेटे साहेब यांचे सहकार्य लाभले.

अधिक वाचाविरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे नगद नारायणाचे दर्शन.

(दि . 7 जानेवारी २०१५) रोजी बीड तालुक्यातील श्री क्षेत्र नारायणगड येथे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नगद नारायणाचे दर्शन घेतले. या वेळी शिवाजी महाराज उपस्थित होते.

अधिक वाचानगद नारायण प्रतिष्ठान स्थापना करून सामाजिक उपक्रम राबविणार. (ह.भ.प. शिवाजी महाराज)

(दि . 7 जानेवारी २०१५) श्री क्षेत्र नारायणगडावर गेली दोन वर्षात विविध उपक्रम राबवित सुमारे चार कोटीच्या पुढे विकास कामे नगद नारायण गडावर झाली आहेत. यामध्ये गो शाळा , पंढरपुरातील अर्धवट मंदिराचे काम. असे अनेक कामे केली आहेत.

अधिक वाचाभगवानगडावर घुमला नारायनगडाचा आवाज.

(३० डिसेंबर २०१४) बीड जिल्ह्यातच नव्हे तर अखंड महाराष्ट्रात नारायणगड आणि भगवानगड हे लोकांचे भक्तिस्थान असून गेल्या अनेक वर्षांपासून या दोन्ही गडात काहीसे अंतर होते. मात्र यावर्षी संत भगवानबाबा यांच्या सुवर्ण महोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित कीर्तन महोत्सवाचे पहिले पुष्प नारायणगडाचे मठाधिपती ह.भ.प. शिवाजी महाराजांनी भगवानगडावर जाऊन गुंफले.

अधिक वाचाश्री क्षेत्र नारायण गडाचे दर्शन आता एका क्लिकवर.. ह.भ.प. शिवाजी महाराजांच्या हस्ते वेबसाईटचे उद्घाटन..

संकष्टी चतुर्थी च्या (दि . १० नोव्हेंबर २०१४) शुभ दिवशी श्री क्षेत्र नारायणगड येथे www.narayangad.com या संकेतस्थळाचे उद्घाटन महंत गुरुवर्य श्री ह.भ.प. शिवाजी महाराज यांच्या हस्ते झाले यावेळी नारायण गडाचे विश्वस्थ दिलीपअण्णा गोरे, महादेव तुपे ,जनार्धन शेळके , भीमराव मस्के, श्री ह.भ.प.संभाजी महाराज , उत्कर्ष गवते आणि संतोष काशिद Blossom Infotech चे मालक आदीची उपस्थिती होती. या वेबसाईटचे निर्मितीसाठी Blossom Infotech या कंपनीचे मालक सुभाष काशिद व संतोष काशिद या बंधूनी मोठी मेहनत घेवून श्री क्षेत्र नारायणगडाची इत्यांभूत माहिती संकलीत करून वेबसाईट वर दिली आहे.

अधिक वाचाश्री क्षेत्र नारायणगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारकाचे भूमिपूजन…

श्री क्षेत्र नारायणगड या ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारकाचे भूमिपूजन दि. १३ मार्च २०१४ रोजी श्री शिवाजी राजे जाधव (लखोजी राजे जाधव सिंदखेडराजा यांचे वंशज ) यांच्या हस्ते व ह.भ.प. शिवाजी महाराज (महंत श्री क्षेत्र नारायण गड ) यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पाडला .

अधिक वाचा