[col class=”span2″]

सोनुबाई
अमृत महाराज
हनुमान भक्त भीमाबाई
तुळशी भक्त भीमाबाई
वडबाबा

[/col]
[col class=”span6″]

१ सोनुबाई

हे ठिकाण गडाच्या उत्तर बाजूस असून जुन्या धरणाच्या पूर्वेस आहे. त्या विषयी अशी आख्यायिका सांगितली जाते कि, पूर्वी सोनुबाई या नावाची एक गरीब स्त्री होती. तिला एक मुलगा होता. तो दररोज जनावरे चारण्यासाठी गडावर येत असे, गडावर आल्यावर एक काळी कपिला गाय त्यांच्या जनावरात येयून चरत असे. असे तीन चार महिने झाले. त्या मुलाने त्या गायी विषयी आपल्या आईला सांगितले. तेव्हा त्याच्या आईने त्यास सांगितले कि, गाय कोणाची जरी असली तरी फुकट का सांभाळतोस आज संध्याकाळी जेव्हा गाय परत जाईल तेव्हा तू गाईच्या मागे मागे जा गाय ज्या घरी जाईन त्या घरी तू आतापर्यंतचे सर्व राखोळीचे पैसे मागून घे.

आईच्या सांगण्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी त्या गुराख्याने गाईचा पाठलाग केला. तेव्हा ती गाय गडाखाली असलेल्या भुयारात गेली. गुराखी देखील गायीच्या मागो माग होताच. ती गाय अशा ठिकाणी थांबली कि, ज्या ठिकाणी सात महान तपस्वी बसलेले होते त्यांनी मुलास येण्याचे कारण विचारले गुराख्याने सांगितले कि मी हि गाय दररोज सांभाळीत आहे तिच्या राखोळीचे पैसे आणण्यास आईने सांगितले आहे. म्हणून मी आलो आहे. त्यांनी गुराख्यास पैशा ऐवजी गायीचे पडलेले शेन घेऊन जाण्यास सांगितले. गुराख्याने नाईलाजाने ते शेण उचलले, दोन्ही हातात ते बसेना म्हणून आपल्या खांधावरील रुमालात ते बांधले आणि भुयाराच्या बाहेर आला. त्या तपस्व्यांनी पैशा ऐवजी शेण दिले, याचा त्याला राग आला .

थोड्या अंतरावर येउन त्याने रुमालावरील शेण टाकून दिले आणि गुरे घेऊन तो घरी आला. रात्री त्याने सर्व हकीकत आपल्या आईला सांगितली तिला देखील त्या तपस्व्याचा राग आला. दुसऱ्या दिवशी शेणाने भरलेला रुमाल धुण्यासाठी मुलाला मागितला. तिने तो भरलेला रुमाल पहिला तेंव्हा ती आश्यर्य चकित झाली कारण त्या रुमालाला शेणाऐवजी सोने चिकटलेले होते. सोन्याच्या आशेने दोघेही मायलेकरे ज्या ठिकाणी शेण फेकून दिले तेथे आली त्याच ठिकाणी ती दोघेही अद्रूष्य झाली.

तेच ठिकाण आज सोनुबाई या नावाने ओळखले जाते आसपासच्या परिसरातील स्त्रिया श्रावण महिन्यात सोनुबाईच्या दर्शनासाठी येतात.

[/col]