काशिमिरा सप्ताह :-

मिरा – भाईंदर (मुंबई) सारख्या शहरी भागात श्री क्षेत्र नारायणगड सेवा भावी संस्थेने (रजि .) सन २०१३ साली श्री संत नगद नारायण महाराज यांच्या प्रेरणेने व वै. ह.भ.प. गुरुवर्य महादेव बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाळी पाडव्याच्या दिवशी अखंड हरीनाम सप्ताह सुरु केलेला आहे. विशेष म्हणजे या सप्ताहासाठी वै. ह.भ.प. गुरुवर्य महादेव बाबा न चुकता दर वर्षी शेवटचे २-३ दिवस जातीने हजर असत व त्यांना या सप्ताहाचे खूप कौतुक वाटे. ते नेहमी म्हणत कि तुम्ही मुंबई सारख्या ठिकाणी पोट भरण्यासाठी एवढ्या दूर आलात तरीही वारकरी संप्रदायाची शिकवण किंवा संस्कार विसरला नाहीत . आताचे मठाधिपती गुरुवर्य ह.भ.प. शिवाजी महाराज यांनी हीच परंपरा पुढे चालू ठेवली आहे. यामुळे येथील भाविक मान ,अपमान ,आळस हे सारे विसरून सप्ताहाची तयारी जोरदार करतात आणि हे सारे स्वयं शिस्तीने घडून येते . या सप्ताहा दरम्यान अनेक कार्याक्रमाची मेजवाणी असते जसे पाहटे काकड आरती ,ज्ञानेश्वरी पारायण,गाथा भजन ,प्रवचन अभंग , हरीपाठ , कीर्तन व जागर असा ७ दिवसा भरगच्च कार्याक्रम असतो . रात्री ८-१० या वेळेत अत्यंत दिग्गज नावाजलेल्या कीर्तनकारांचे कीर्तन असते .शेवटच्या दिवशी नारायण गडाचे मठाधिपतीनची भव्य रथात दिंडी मिरवणूक काढली जाते या मिरवणुकीत मोठ्या प्रमानात स्त्री ,पुरुष व युवक फेटे , टी – शर्ट घालून सहभागी होतात त्यानंतर काल्याचे कीर्तन होते त्यानंतर महाप्रसादाचे वाटप होऊन सप्ताहाची सांगता होते. या सप्ताहात सुरुवातीला फक्त नारायण गड व बीड जिल्ह्यातील भाविक सहभागी होत. परंतु आता या सप्ताहाने अत्यंत भव्य रूप धारण केलेले आहे यामध्ये आता येथील स्थानिक नागरीका बरोबर , येथे कामानिमित्त वास्तव्याला असणारे मराठवाडा,विदर्भ,पश्चीम महाराष्ट्र,उत्तर महाराष्ट्र इत्यादी ठिकाणचे सर्वधर्मीय भाविक सुद्धा सहभागी होतात. यावर्षी मंडळाने तप (म्हणजे बारा वर्षे) पूर्ती सोहळा अत्यंत भव्य दिव्य स्वरुपात साजरा केला. हा सोहळयाला अगदी आधुनिक भाषेत म्हणायचेच तर कॉर्पोरेट स्वरूप प्राप्त झाले होते कारण मंडळाने काही नवीन उपक्रम सुरु केले होते जसे “माउली कोनासंगे ” या उपक्रमाचे उदाहरण घेत येईल यामध्ये रात्री कीर्तनाला सुरु होताना प्रत्येकाने आपले नाव लिहून एक चिट्ठी पेटीत टाकायची व कीर्तना नंतर महाराजांच्या हस्ते लक्की ड्रा पद्धतीने महिला व पुरूष प्रत्येकी एक चिट्ठी काढून त्यांना महाराजांच्या हस्ते ज्ञानेश्वरी ग्रंथ,शाल,श्रीफळ व आकर्षक स्मृतिचिन्ह(ट्राफी)देण्यात आली. यावर्षी सुप्रसिद्ध कीर्तनकार ,पत्रकार व “अच्छे दींनचे घोडे कोणत्या देशात अडले ” या गाजलेल्या कविताचे लेखक श्री ह.भ.प. श्यामसुंदर सोन्नर महाराज यांनी शेतक-यांनी आत्महत्या करू नये या विषयावर केलेल्या कीर्तनाची विडीओ शुटींग काढून ती महाराष्ट्रभर वितरीत करण्यात आली त्यामुळे नारायण सेवाभावी मंडळाचे नाव महाराष्ट्रात पोहचले. येणा-या प्रत्येक पाहुण्याला व महाराजांना हि स्मृतिचिन्ह (ट्राफी) भेट देण्यात आले. या वर्षी या सोहळ्याला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली यामध्ये खासदार राजन विचारे आमदार व शिवस्मारक समितीचे अध्यक्ष श्री विनायक मेटे, आमदार मुजफ्फर हुसैन , आमदार प्रताप सरनाईक , आमदार नरेंद्र मेहता, श्री छत्रपती शाहू बँकेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनराव जाहेर पाटील, मीरा-भाईंदर चे आयुक्त , उप आयुक्त, स्थानिक पोलिस उपनिरीक्षक, अनेक नगरसेवक व शिर्डी साईबाबा संस्थान चे मुख्य पुजारी श्री सुलाखे गुरुजी यांनी सहभागी होऊन सप्ताहाची शोभा वाढवली. अत्यंत शिस्तीने साजरा होत असलेला हा सोहळा व त्याचे वाढते स्वरूप मीरा भाईंदर मध्ये चर्चेचा विषय झालेला आहे. तसेच या सप्ताहामुळे बीड जिल्ह्यातील नागरिकांना येथे एक प्रकारचे नवीन ओळख निर्माण झाली आहे.