नाम (नारळी) सप्ताह :-
नाम (नारळी ) सप्ताह हा प्रत्येक गावामार्फत केला जातो. धर्मविधीला व्यक्तिगत न ठेवता सामुदाईक करण्याचा हा एक व्यापक प्रयास होय. या नामसप्ताहाचा खर्च वर्गणी करून करण्यात येतो. हा नामसप्ताह स्वीकारणे याला नारळ घेणे असे म्हणतात. नारळ घेण्याची प्रत्येक गावाला ओढ असते. पुढील ५ ते १० वर्षाच्या नारळाचे वाटप करण्यात येते आणि त्याच्या तयारी साठी गावात नियोजन होते.
एखाद्या गावाने नारळ घेतला कि पुन्हा सप्ताह होई पर्यंत त्या गावात मांस भक्षण, दारूबंदी,जुगार यास मज्जाव करण्यात येतो आणि हा नियम तोडनाऱ्यास काही तरी वाईट अनुभव आलेल्याचे ते मंडळी स्वतः सांगतात. नारळ घेतलेल्या गावच्या लोकात उत्साह संचारतो. सारा गाव आळस,अभिमान, मान-अपमान विसरून सप्ताहाच्या तयारीला लागतो आणि हे सर्व स्वयंशिस्तीने घडून येते.गावात सप्ताह दरम्यान अनेक कार्यक्रमाची मेजवानी असते जसे, पहाटे काकड आरती ,प्रवचने,कीर्तने,भगवतगीता पारायण,अभंगे, हरिपाठ, रात्री कीर्तन-भजन असा सात दिवसांचा कार्यक्रम ठरलेला असतो. शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन होऊन मग सांगता होत असते. सात दिवसांमध्ये प्रख्यात कीर्तनकारांचा कीर्तनाचा कार्यक्रम विशेष असतो. काल्याचे कीर्तन अगदी विशेष असते या मध्ये श्री कृष्णाच्या बाल लीलाचे वर्णन आणि दहीहंडीचा कार्यक्रम असतो . या कीर्तनात सर्वच जणांना जणू बालगोपाल झाल्याचा भास होतो.काही वेळ ईश्वरमय होऊन जनसागर त्या कीर्तनात रममाण होतो आणि याच दिवशी प्रसाद वाटण्यात येत असतो. भाविक भक्त मोठ्या संख्याने सहभागी होत असतात. लोक सागराचे रूप या नारळी सप्ताहात पहावयास मिळते.

              परम पुज्य महंत वै. महादेव महाराजांनी २०२२ पर्यंत खालील गावकरी मंडळाला नारळ दिलेले आहेत.

इ. स.

गाव

वर्षे

२०१४

तरटेवाडी

६२

२०१५

पारगाव

६३

२०१६

बरगवाडी

६४

२०१७

दिमाखवाडी

६५

२०१८

सौंदाना

६६

२०१९

बऱ्हाणपूर

६७

२०२०

केतुरा

६८

२०२१

मादळमोही

६९

२०२२

सुरळगाव

७०