श्री क्षेत्र नारायणगड सेवा भावी संस्था आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची काल सांगता झाली. मंडळाचे हे १४ वे वर्ष होते या सप्ताहाला मिरा भाईंदरच्या महापौर सौ. डिंपल मेहता, आमदार नरेंद्र मेहता, युवा सेना सचिव पूर्वेश सरनाईक, अनेक नगरसेवक स. पोलीस आयुक्त गुन्हे अन्वेषण ठाणे श्री मुकुंद हातोटे साहेब, छत्रपती राजर्षी शाहू बँकेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनराव जाहेर पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी व अधिकारी वर्गांनी भेट दिली. भेट देणार्याअ सर्व मान्यवरांना मंडळातर्फे सुंदर अशी ज्ञांनेश्वर माऊलीची प्रतिमा भेट देण्यात आली. यावर्षी प्रथमच दररोज कीर्तन व प्रवचंनाबरोबर मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन मंडळाने केले होते यामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून मोफत डोळे तपासणी, दात, डायबेटीस रक्त तपासणी आदी मोफत केल्या आहेत. शेवटच्या दिवशी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते यामध्ये सुमारे ७५ जणांनी रक्तदान केले व ज्या गरजू भाविकांचे मोतीबिंदू ऑपरेशन मंडळाकडून मोफत केले जाणार आहे. आरोग्य शिबिरचा लाभ असंख्य भाविकांनी घेतला.. शेवटच्या दिवशी गुरुवर्य महंत शिवाजी महाराज (मठाधिपती श्री क्षेत्र नारायणगड संस्थान बीड) यांची रथामध्ये भव्य अशी दिंडी काढण्यात आली होती यामध्ये पुरुषाबरोबरच महिलांचा सहभाग लक्षयनीय होता. दिंडी मार्गात अनेक ठिकाणी सुंदर अशी रांगोळी काढण्यात आली होती. काल्याचे कीर्तन झाल्यावर सुदधा मंडळाने प्रशिद्ध व्याख्याते श्री विनोद अनंत मेश्री यांचा “ मला शिवाजी व्हायचय “ या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.