श्री क्षेत्र नारायणगडाच्या सर्वांगीण विकासासाठी आज मंत्रालयात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात पालकमंत्री, विश्वस्त, महंत व आ. मेटेंच्या उपस्तिथीमध्ये महत्वपूर्ण बैठक होत नारायणगडासाठी तीर्थक्षेत्र योजनेअंतर्गत २५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळाली आहे .
श्री . क्षेत्र नारायणगड च्या 400 एकर वरील प्रस्तावित आराखड्यात कायमस्वरूपी पाणी पुरवठा व्यवस्था, सुलभ शौचालय, सुसज्ज असे वाहनतळ व बस स्थानक, भक्त निवास, सौरऊर्जा यंत्रणा, सांस्कृतिक सभागृह, प्रसादालय, गोशाळा आदी बाबींचा जाणीवपूर्वक समावेश केला आहे.
गडाची नैसर्गिक शोभा वाढविण्यासाठी वन विभागा मार्फत साधारणपणे 2 कोटी रुपये वन उद्यान उभारण्यात येणार असून, गडावरील घन कचरा आणि पाणी निचरा व्यवस्थापनाचे काम हाती घेण्यात येणार असून त्याच बरोबर जलसंधारण विभागा मार्फत पाणी अडविण्यासाठीचे काम केले जाणार आहे.
या निधीमधून नारायणगड संस्थानचा सर्वांगीण विकास करण्यात येणार असून या महत्वपूर्ण बैठकीस कलेक्टर व सी.इ.ओ हेही उपस्थित होते.

  • 17522898_1416418105046008_8996311694195948796_n
  • 17522945_1415757541778731_5201989039522646925_n
  • 17757156_1416412098379942_8967600844984722903_n