महंत शिवाजी महाराज हे भव्य-दिव्य अशा ऊभारलेल्या मंचावरील सिंहासनावर आरूढ होताच भाविकांनी टाळ्यांचा जल्लोष केला महंत शिवाजी महाराज यांच्या प्रेरणादायी भाषणाने सर्व भाविकांध्ये चैतन्य निर्माण झाले
मुख्य समारंभानंतर गडाचे महंत शिवाजी महाराज यांची अश्वावर बसून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. या सोहळ्याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे अठरापगड जातीतील हजारो भाविक एकञ आले होते.पुढच्या वर्षीचा नारायणगड दसरा मेळावा लाखोंच्या संख्येने होईल असे महंत शिवाजी महाराज यांनी जाहीर करताच भाविकांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला